अखेर ठरले : श्रीराम पाटील रावेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार !

रावेर-शालीक महाजन | गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सुकतेला विराम देत उद्योजक श्रीराम पाटील यांनी आपण रावेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष मैदानात उतरणार असल्याची भूमिका आज जाहीर केली आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

अखेर रावेर विधानसभेसाठी उद्योजक श्रीराम पाटील यांचे राजकीय लॉन्चिंग झाले असून त्यांनी याबाबतची पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे.जनतेने रावेर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला एक संधी द्यावी तसेच पुढे माझ्या परिवारातुन कोणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे प्रत्येक टर्मला नवीन आमदार निवडुन देणारे जनता-जर्नादन येणार्‍या २०२४ ला आपला आशिर्वाद कोणाला देतात याकडे आतापासुनच सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्योजक श्रीराम पाटील यांनी मॅक्रो व्हिजन ऍकडमी शाळेत आपल्या कार्यकर्त्यांसह पत्रकार परिषद घेऊन आगामी काळासाठी आपली भूमिका जाहीर केली. याप्रसंगी श्रीराम पाटील म्हणाले की रावेर विधानसभा निवडणूक मी लढवावी हे जनतेच्या मनात आहे. म्हणून आपण पुढची निवडणूक लढणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास रावेर विधानसभा निवडणूक लढणार आहे. दोन्ही निवडणुका एकत्र न झाल्यास आम्ही संपर्कात असलेल्या पक्षाने उमेदवारी दिली तर रावेर लोकसभा निवडणूक लढवेल उमेदवारी न मिळाल्या शंभर टक्के रावेर विधानसभा निवडणूक आपण अपक्ष लढणार असल्याचे निश्चित केले आहे.

श्रीराम पाटील पुढे म्हणाले की आम्ही रावेर मतदारसंघातील स्थाईक असून सर्व-साधारण जनतेशी माझी नाळ जुळलेली आहे.रावेर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माझी ब्लूप्रींट देखिल तयार आहे.मतदार संघात रोजगार उपलब्ध करणे शेतक-यांना येणार्‍या समस्या सोडवणे नवीन स्टार्टअप उभारणे, रस्ते, यासह अनेक विषयांवर माझी ब्लूप्रींट तयार असुन लवकरच मी ते जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.जनतेने आगामी निवडणुकीत मला एक संधी द्यावी माझा शब्द आहे. यानंतर पुढे माझ्या परीवारातील कोणीही निवडणूक लढणार नाही आणि मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदण्याचे टार्गेट असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली आहे.त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात आहे.

यावेळी उद्योजक श्रीराम पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला गोपाल दर्जी,पिपल्स बँक संचालक सोपान साहेबराव पाटील, विजय गोटीवाले, प्रविण पाचपोहे,मॅक्रो व्हिजन ऍकडमीचे सचिव स्वप्निल पाटील,प्रमोद पाटील,प्रशांत पाटील उपस्थित होते. आज श्रीराम पाटील यांनी भूमिका जाहीर केल्याने आता रावेर विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content