कृषी पदवी प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । कृषी पदवीच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षीय प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली असून यासाठी १६ डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

राज्यात एकूण १५ हजार २२७ जागा असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यात बी.एस्सी ऑनर्स (कृषी), बी.एस्सी (उद्यानविद्या), बी.एस्सी वनविद्या, बी.एस्सी मत्स्यविज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी.टेक अन्न तंत्रज्ञान, बी. एस्सी सामुदायिक विज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान आणि बी.एस्सी कृषी व्यवसाय वयःस्थापन आदी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांसाठी बुधवारपासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली. विद्यार्थ्यांना १६ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ते संकेतस्थळावर अपलोड करावयाचे आहे.

अंतिम गुणवत्ता यादीनंतरही रिक्त राहणार्‍या जागांवर जागेवरच प्रवेश फेरी राबवण्यात येईल. ही प्रक्रिया ११ जानेवारी २०२१ पासून सुरू होणार असून १५ जानेवारीपर्यंत सर्वच पात्र उमेदवारांना प्रवेश देऊन ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

कृषी अभ्यासक्रमांसाठी १६ डिसेंबर ऑनलाईन नोंदणीची मुदत आहे. यानंतर २० डिसेंबर तात्पुरती गुणवत्ता यादी, २१ ते २२ डिसेंबर तक्रार नोंदणीचा कालावधी, २५ डिसेंबर अंतिम गुणवत्ता यादी, २७ डिसेंबर पहिल्या प्रवेश फेरीचे वाटप, २८ ते २९ डिसेंबर रिपोर्टींग कालावधी, ३१ डिसेंबर दुसर्‍या प्रवेश फेरीची वाटप यादी, १ ते २ जानेवारी २०२१ रिपोर्टींग कालावधी, ५ जानेवारी तिसर्‍या प्रवेश फेरीची वाटप यादी, ६ ते ७ जानेवारी रिपोर्टींग कालावधी, मूळ कागदपत्रे व शुल्क भरणे, ९ जानेवारी रिक्त जागांचा तपशील, ११ ते १५ जानेवारी रिक्त जागांकरिता प्रवेश फेरी, १२ ते १९ला संस्थास्तरीय कोट्यातील जागा भरणे अशा प्रकारे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक असणार आहे.

Protected Content