खडसे महाविद्यालयात “लिंग समभाव” विषयावर व्याख्यान

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील शिक्षणपूरक उपक्रम समिती अंतर्गत “लिंग समभाव” या विषयावर प्रा.डॉ. गणेश चव्हाण (इंग्रजी विभाग) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी स्त्रियांचे समाजातील स्थान हे नेहमीच दुय्यम राहिलेले आहे. ती एक समाजाची स्त्रियांप्रती असलेली सामाजिक धारणा झालेली आहे. अशा या अन्यायकारक स्त्रि- विषयक सामाजिक धारणांना छेद देण्यासाठी व समाजात स्त्रि-पुरुष यांच्यात लिंग समभाव निर्माण करण्यासाठी स्त्रियांबरोबरच पुरुषांनीही आचरण करणे आवश्यक आहे, असा मौलिक संदेश दिला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. एच.ए.महाजन होते. स्त्रियांना जर सामाजिक जाचक रुढी,परंपरांतून स्व:ताची सुटका करुन घ्यावयाची असेल, तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. तेव्हा स्त्रियांनी शिक्षण घेतले पाहिजे व स्त्रि शिक्षणासाठी काम केले पाहिजे असे आवाहन प्र.प्राचार्य डॉ.एच.ए.महाजन यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डी.आर.कोळी, सूत्रसंचालन प्रा. ताहिरा मिर यांनी केले. तर आभार कु.अशपाक तडवी याने मानले.

Protected Content