रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी लवकरच अध्यादेश-उपमुख्यमंत्री

कराड । मराठा आरक्षणामुळं रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते येथे आज पत्रकारांशी बोलत होते.

कराड येथील प्रीती संगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना पवार म्हणाले, अकरावीच्या प्रवेशाबाबत लवकरच अध्यादेश काढला जाईल. या सुप्रीम कोर्टाने ९ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे ९ सप्टेंबर पूर्वी जे प्रवेश झाले आहेत ते एसईबीसीच्या पद्धतीने होतील. मात्र, त्यानंतरच्या प्रवेशांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाशी, अ‍ॅडव्होकेट जनरलशी तसेच अ‍ॅड. थोरातांशी चर्चा केली. त्यानंतर दोन-तीन दिवसांतच सरकार अध्यादेश काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणामुळं अकरावी तसेच आयटीआय असे अनेक शैक्षणिक प्रवेश अद्यापही रखडले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार? असा सवाल विचारला जात आहे. यापार्श्‍वभूमीवर याबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण आता न ठेवता खुल्या गटातून त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Protected Content