अमित शाहांची ‘ती’ राजकीय खेळी पाहण्यास उत्सुक : शरद पवार

sharad pawar new 696x447

 

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपला ज्या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा सिद्ध करण्यात अडचणी आल्या आहेत तेव्हा तेव्हा सत्तास्थापनेसाठी शाह यांची राजकीय खेळी भाजपसाठी तारणहार ठरली आहे. ते याच कौशल्यांसाठी ओळखलेही जातात. त्यामुळे आपणही (महाराष्ट्राच्या राजकारणात) त्यांचे हे कसब पाहण्यासाठी उत्सुकता असल्याची कोपरखळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मारली आहे.

 

शिवसेनेच्या संजय राऊत यांनीसुद्धा पवारांची भेट घेतली. ज्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. यावेळी पवार म्हटले की, आम्ही शिवसेना- भाजपचे सरकार स्थापन होण्याची वाट पाहत आहोत. एवढेच नव्हे तर, भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सत्तास्थापनेचे कसब पाहण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही पवार म्हणाले. सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यानच बुधवारी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी अनेक राजकीय नेत्यांची ये-जा वाढली होती.

Protected Content