Home Cities जळगाव बेंडाळे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

बेंडाळे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

0
33

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

डॉअण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालयात योग दिन सर्व कनिष्ठ व वरिष्ठ प्राध्यापक शिक्षकेतर बंधू-भगिनीने साजरा केला. प्रमुख योगा प्रशिक्षक प्रा.डॉ.गीतांजली भंगाळे यांनी सर्वांकडून ऑनलाईन पध्दतीने विविध आसने प्रोटोकॉल नुसार व शास्त्रोक्त, सोप्या, पद्धतीनें करून घेतली. प्राचार्या यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व योगा दिनाचे महत्त्व, समजून सांगितले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. अनिता कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाने कार्यक्रम आयोजित केला.


Protected Content

Play sound