शिंदे भाजपला पाठींब्याचे देणार पत्र : आजच ठाकरे सरकार पडणार ?

गुवाहाटी-वृत्तसेवा | एकनाथ शिंदे आज दुपारी मुंबईत दाखल होणार असून ते आपल्या गटाचा भाजपला पाठींबा असल्याचे पत्र राज्यपालांना देणार असल्याची माहिती समोर आली असून यामुळे आजच ठाकरे सरकार पडण्याची शक्यता बळावली आहे. तर विद्यमान राज्य सरकारचे काऊंट डाऊन सुरू झाल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

आज पहाटे गुवाहाटी विमानतळावर एकनाथ शिंदे हे आपल्या सहकार्‍यांसह पोहचले. त्यांच्यासाठी स्वतंत्र विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेच्या विचारांशी प्रतारणा करणार नसल्याचे सांगितले. हिंदुत्व हाच आमचा श्‍वास असून आम्ही यापासून दूर जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जय महाराष्ट्र असे म्हणून त्यांनी याबाबत पुढे भाष्य करण्यास नकार दिला.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज दुपारी विशेष विमानाने मुंबईत दाखल होऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करून ते आपल्या गटाचा पाठींबा भारतीय जनता पक्षाला पाठींबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या सोबत एकूण ४० आमदार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. हा गट भाजपसोबत गेल्यास आजच ठाकरे सरकारी पडण्याची शक्यता असून याबाबतच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: