एरंडोल तालुक्यात कोरोना लसीची रंगीत तालीम

 

एरंडोल, प्रतिनिधी । तालुक्यातील तळई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली.रा ज्यात लवकरच लसीकरण करण्यात येणार असुन यापार्श्वभूमीवर प्रात्यक्षिक करण्यात आले.

कोरोन लसीच्या रंगीत तालीम दरम्यान ५५ कर्मचाऱ्यांना कोरोना लस टोचणे प्रात्यक्षिक देण्यात आले. याप्रसंगी एरंडोल तालुका आरोग्याधिकारी डॉ. फिरोज शेख यांनी प्रत्यक्ष लसीकरण करतांना येणाऱ्या अडचणी बद्दल मार्गदर्शन केले. दरम्यान यावेळी प्रत्यक्षात लसीकरण मांडणी करण्यात आली होती. त्यांचे तीन खोल्यांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. पहिल्या खोलीत आलेल्या व्यक्तींची नोंदणी करुन प्रतिक्षालय असणार आहे. दुसऱ्या खोलीत प्रत्यक्ष लस टोचली जाणार आहे तर तिसऱ्या खोलीत लस टोचल्यानंतर त्या व्यक्तींचे अर्धातास निरीक्षण केले जाणार असल्याचे डॉ. फिरोज शेख यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. वानखेडे, डॉ. मराठे, डॉ. निशांत शेख, डॉ. शिंदे, तालुका आरोग्य सहाय्यक राठोड, पंचायत समिती आरोग्य सेवक केशव ठाकुर तसेच तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content