अमळनेरात मुसळधार पावसामुळे साचले पाणी

अमळनेर प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. या संततधार पावसामुळे शहरातील अनेक कॉलनीत पाणी साचल्याने तेथील नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.

काही ठिकाणी तर जमीनदोस्त असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील जीवणावश्य वस्तूं पूर्णतः भिजल्याने नियोजन शून्य नगर पालिका प्रशंसान विराधात रोष व्यक्त होतांना दिसून आला. तर दुसरीकडे काहीनी नगर पालिकेच्या आगामी निवडणुकित मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या. यात प्रामुख्याने गुरुकृपा कॉलनी, एलआयसी कॉलनी तसेच पिंपळे रोड वाशीय रहिवाशांची आज या मुसळधार पावसामुळे चांगलीच दमछाक झाली. शहरातील बहुतांश ठिकाणी असणारे लहान मोठे नाले पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक व येजा करणाऱ्यांना कसरत करावी लागली.

कळमसरे फरशी पूल पाण्याखाली

अमळनेर तालुक्यातील कळमसरे सह परिसरात सुमारे एक तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. परिणामी शेत शिवारात पावसामुळे तुडुंब होवून वाहू लागल्याने नाले ओढे दुथडी भरून वाहत होते. गावाच्या मध्यातून जाणारा फरशी पुल पाण्याखाली गेल्यामुळे जवळजवळ सकाळी10 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत तीन ते चार फुटावर वेगाने पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे अनेक वाहनधारकांना ताटकळत उभे राहावे लागले. तर काहींनी फेऱ्याने मार्गक्रमण करण्यास पसंती दिली.पूलावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप कसरत करावी लागली.

Protected Content