पहूर येथील पाच कोरोना संशयित जिल्हा रूग्णालयात दाखल

पहूर ता जामनेर रवींद्र लाठे । येथील लेले नगर व पहूर कसबे भागातील रहिवासी असणार्‍या पाच जणांना कोरोना संसर्गाच्या संशयातून जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहूर लेले नगर व पहूर कसबे भागातील पाच जणांना पहूर रुग्णालयात प्राथमिक तपासणी दरम्यान कोरोना सदृश्य लक्षणे आढळली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. या पाच जणांना जळगाव कोवीड रुग्णालयात चाचणी साठी रवाना करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ हर्षल चांदा यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्युज शी बोलताना दिली.

दरम्यान, यातील चार बाहेरून आलेले असून एक जण गावातील आहे. यातील एक महिला गावातीलच आहे. यांची पहूर रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक तपासणी केली. यानंतर त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून पुढील चाचणी साठी जळगाव कोवीड रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांना दिल्याचेही डॉ चांदा यांनी सांगितले आहे.

तर, जिल्हा अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या आदेशानुसार पहूर रुग्णालयात शनिवार पासून फिवर क्लिनिक सुरू केले आहे. गावातील कोणत्याही नागरिकांना ताप जाणविल्यास त्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांकडून तपासणी करून घ्यावी. व या रुग्णांवर पहूर रुग्णालयात च उपचार करण्यात येणार आहे. अधिक चे लक्षणे आढळल्यास जळगाव कोवीड रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. हर्षल चांदा यांनी दिली आहे.

Protected Content