भुसावळातील समतानगर परिसर सील; निर्जंतुकीकरणास प्रारंभ

भुसावळ प्रतिनिधी । येथील एक रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने संबंधीत रूग्णाचे वास्तव्य असणारा समतानगर परिसर सील केला असून या संदर्भात प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन उपाययोजना जाहीर करण्यात आल्या.

आज सायंकाळी शहरातल्या समतानगर परिसरातील एक ४३ महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. याप्रसंगी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धिवरे, मुख्याधिकारी करूणा डहाळे, डीवायएसपी गजानन राठोड यांची उपस्थिती होती. याप्रसंगी समतानगर परिसर सील करून या भागात निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Protected Content