ऑक्सीजन सिलेंडरचे दर निश्‍चित करा : मनसेची मागणी

जळगाव प्रतिनिधी । कोविडच्या उपचारासाठी ऑक्सीजनचा तुटवडा भासत असतांना जिल्हाधिकार्‍यांनी ऑक्सीजन सिलेंडरचे दर देखील निश्‍चित करून द्यावे अशी मागणी मनसेचे विभागीय अध्यक्ष मतीन पटेल यांनी केली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात मतीन पटेल यांनी म्हटले आहे की, सध्या कोरोनाच्या रूग्णांसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सीजनची आवश्यकता भासत आहे. जळगाव शहरात व भुसावळ येथे ऑक्सीजन रिफील् प्लॅन्ट आहेत. तेथून जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल ऑक्सीजन रिफील करून घेतात. मात्र येत्या काही दिवसा पासून ऑक्सीजन रिफील प्लॅन्ट मधुन अवाजवी पैसे घेतले जात आहेत. सिलेंडर भरल्या नंतर पक्के बिल दिले जात नाही.परिणामी काळाबाजार होत असल्याचे दिसून येत आहे. जास्त पैसे देणार्‍या लोकांना सिलेंडर लवकर भरून दिले जात आहे.ज्यांनी पक्के बिल मागितले त्यांना हाकलून दिले जात आहे.

याची दखल घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी ऑक्सीजन सिलेंडरचे दर निश्‍चित करुण दयावे व रिफिलिंग करणार्‍या कंपन्याना पक्के बिल देण्याचे आदेश द्यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.