शुभवार्ता : रावेर तालुक्यातील चौघांनी केली कोरोनावर मात

रावेर प्रतिनिधी । येथील कोविड सेंटरवर उपचार घेऊन तीन पुरूष व एक महिला अशा चार रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने त्यांना निरोप देण्यात आला.

रावेर येथील कोविड सेंटर वर तीन पुरुष व एक महिला असे एकूण चार कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. तर २० निगीटीव्ह असलेल्यांना सुध्दा सोडण्यात आले यामुळे तालुक्यात सर्वत्र कोरोना पोझिटीव्ह पेशंट वाढीचा कहर सुरु असतांना यातुन एक सुखद बातमी आली आहे. निंभोरासिम येथील तीन कोरोनावर मात करणार्‍या रूग्णांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या एका चिमुकलीला घरी जात असतांना प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसिलदार उषाराणी देवगुणे, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, डॉ एन. डी. महाजन यांनी तिला चॉकलेट दिले.

निंभोरासिम (ता रावेर) येथे अंत्यसंस्कार मधून कोरोनाचे पेशंट येथे वाढले होते. चौदा कोरोना बाधीत रूग्ण येथे आढल्याने हे गाव जिल्हाभरात चर्चेला गेले होते. परंतु वेळेत महसूल व आरोग्य प्रशासनाने खबरदारी घेतल्याने गावात अजुन पेशंट वाढले नाही.त्यापैकी चार कोरोना पोझिटीव्ह पेशंटने कोरोनावर मात केली असून ते बरे झाले असून त्यांना कोविड सेंटर वरुन निरोप देऊन वाहनाने त्यांच्या मुळ गावी निंभोरासिम येथे सोडण्यात आले. तर इतर २० कोरोना निगीटीव्ह असलेल्यांनाही शुक्रवारी कोविड सेंटर वरुन सोडण्यात आले.

Protected Content