जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांची सावदा येथे भेट

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्‍वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आणि पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सावदा येथे भेट देऊन प्रतिबंधीत ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.

येथे कोरोना रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत असून सावदा हे आता जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठरू पहात आहे. या पार्श्‍वभूमिवर शहरात शुक्रवारी जिल्हाधिकारी अधिकारी अविनाश ढाकणे व पोलिस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी संयुक्त पणे भेट दिली. त्यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आलेल्या संभाजी चौक, गांधी चौक स्टेशन नाका गवत बाजार तसेच इतर ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकारीवर्ग यांना योग्य त्या सूचना देते कोरोनाचे वाढते प्रभावास रोखण्या संबंधित कडक उपाय योजना करण्या बाबत सूचविले. यावेळी फैजपुर प्रांताधिकारी डॉ अजीत थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, माजी नगराध्यक्ष, राजेश वानखेडे, मुख्याधिकारी सौरभ जोशी, सपोनि राहुल वाघ, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी आदी उपस्थित होते.

Protected Content