यावल येथे पोषण आहाराबाबत आढावा बैठक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदीवासी वस्तीपाड्यांवर ए पी जे अब्दुल कलाम अमृत पोषण आहार योजनाची काटेकोर अमलबजावणी करण्यासंदर्भात पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली.

यावलमध्ये पार पडलेल्या या महत्वाच्या आढावा बैठकीत तालुक्यातील आंबा पानी (वाघझिरा ), चिपखेडा , सांग्यादेव, माथन, पैझरी , धुळेपाडा , वड्री धरण, आसराबारी, निमछाव पाडा ,रोशन वड्री , टेंभुर्णीबारी आणी निंबादेवी धरण अशा १४ आदीवासी वस्तीच्या अतिदुर्गम पांड्यावर शासनाच्या वतीने अंगणवाडी कक्षेत येणार्‍या सर्व स्त्रिया आणी स्तनदा मातांना सहा महीन्याच्या कालावधीसाठी एक वेळेस चौरस आहार देण्याबाबत चर्चा झाली. त्याचप्रमाणे आदीवासी क्षेत्रातील कपोषण ,बालमृत्यु व कमी वजनाचे बालके जन्मास येणे यासारखे गंभीर समस्यावर मात करण्यासाठी ही एक परिणामकारक उपाययोजनेची योग्य रित्या डॉ एपीजे अब्दुल कलाम पोषण आहार पुरक योजनेची काटेकोर अमलबजावणी करण्यासंदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांच्या अध्यक्षतेखाली व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.

यावल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय ईमारतीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या आढावा बैठकीत सरपंच , ग्रामसेवक ,आंगणवाडी सेविका ,सेविका ,पोषण आहार पुरक समितीचे अध्यक्ष यांची प्रामुख्याने उपस्थिती होती . यावेळी उपस्थितांना गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड , बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी अमृत पोषण आहारच्या अमलबजावणी बाबत विविध विषयांवर मार्गदर्शन करून सुचना दिल्यात.

Protected Content