मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या एनएमएमएस परिक्षेत जे.ई.स्कूल, मुक्ताईनगर येथील एकुण ४१ विदयार्थी परीक्षेत बसलेले होते त्यापैकी ५ विद्यार्थाची मेरीट मध्ये निवड झालेली आहे.
मेरीट मध्ये निवड झालेल्या विद्यार्थांध्ये १) पाटील हर्षल विजय 2) धनके सार्थक बाळू ३) बोदडे अदित्य सिद्धार्थ ४) खुळे दिशांत आनंद ५) जुमळे गायत्री राजू हे विद्यार्थी आहे. यांना NMMS शिष्यवृत्ती म्हणून प्रत्येकी वार्षिक बारा हजार रुपये असे चार वर्ष म्हणजेच ४८००० रुपये शिष्यवृत्ती शिक्षणासाठी मिळते. विद्यार्थांच्या यशाबद्दल संस्थेच्या चेअरमन सौ. रोहिणीताई खडसे खेवलकर, संस्थेचे सचिव डॉ. सी. एस. चौधरी व संस्थेचे सदस्यांनी तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर.पी.पाटील सर, उपमुख्याधापक श्री. जे.जे.पाटील सर, पर्यवेक्षक व शिक्षक यांनी अभिनंदन केले.