अमळनेरात महाविकास आघाडीची सरशी : आ. अनिल पाटलांचे निर्विवाद वर्चस्व !

अमळनेर-गजानन पाटील | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज लागलेल्या निकालात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून या माध्यमातून आमदार अनिल पाटील यांनी सहकारातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे.

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निकालाचा आज दुसरा टप्पा होता. यात नेमकी कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. शेवटचे निकाल जाहीर तेंव्हा ११ जागांवर त्यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे तीन माजी आमदार यांच्या नेतृत्वाखालीअसलेल्या भाजपच्या पॅनलला धोबीपछाड मिळाली आहे.याठिकाणी भजपला माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार बी.एस.पाटील व शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या पॅनलला केवळ चार जागा मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एकूणच अमळनेर बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार अनिल पाटील यांच्यासह, भाजपच्या तीन माजी आमदारांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.मात्र अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचाच बोलबाला दिसून आला. दरम्यान भाजपचे माजी आमदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत अल्प जागा आल्यामुळे याठिकाणी भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. तर आमदार अनिल पाटील यांनी सहकारातील त्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे.

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल खालील प्रमाणे आहेत. यात विजयी उमेदवाराचे नाव आणि मिळालेली मते देण्यात आलेली आहेत.

पुरुष व महिला राखीव सोसायटी मतदारसंघ

१) स्मिताताई वाघ- ७२६
२) अशोक आधार पाटील -७२१
३) सुभाष जीभाऊ-६५६
४) सुरेश पीरन पाटील- ५०७
५) अशोक हिंमत पाटील-४२१
६) नितीन बापूराव पाटील -४०९
७) भोजमल पाटील-३९४

सोसायटी मतदारसंघ

१) सुषमा देसले – ६३४
२) पुष्पा पाटील – ५९३

सेवा सहकारी वि जा भ ज मतदार संघ

१)समाधान धनगर – ६०३

इतर मागास वर्गीय मतदार संघ

१) डॉ अनिल शिंदे – ७२२

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ

१) प्रफुल्ल पाटील – ५०६
२) सचिन पाटील – ५१०

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदार संघ

१) हिरालाल पाटील – ४८१

ग्रा. पं. अनुसूचित जाती जमाती मतदार संघ

१) भाईदास भिल – ४३३

हमाल-मापाडी मतदार संघ

१) शरद पाटील – १९५

अशा प्रकारे महाविकास आघाडीला ११; भाजपला ४ जागा मिळाल्या असून एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. आधीच व्यापारी मतदारसंघातून वृषभ पारेख आणि प्रकाश अमृतकर हे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामुळे एकूण तीन उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. या तिन्ही संचालकांनी महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे. अर्थात, या माध्यमातून आघाडीला १४ सदस्यांचे भक्कम पाठबळ मिळाले आहे.

Protected Content