ईलक्ट्रीक डिपी बसविण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक

पहूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महावितरण कंपनीचे ईलेक्ट्रीक डीपी बसवून देतो असे सांगून शेतकऱ्याकडून वेळोवेळी २ लाख २४ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात शनिवार २९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता पहूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी जयवंत काकडे (वय-४९, रा. लोंढरी बुद्रुक ता.जामनेर) यांचे लोंढरी शिवारात शेत असून शेतात नवीन ईलेक्ट्रीक डीपी बसवण्यासाठी त्यांनी महावितरण कंपनीत अर्ज केला होता. त्यानंतर श्रीराम मांगो राठोड  रा. लोंढरी ता.जामनेर,  सुपडू उखा पाटील आणि नरेंद्र सुपडू पाटील रा. पिंपळकोठा ता.जामनेर यांनी शेतकरी शिवाजी काकडे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून रोखीने आणि ऑनलाईन पद्धतीने असे एकूण २ लाख २४ हजार रुपये घेतले. त्यानंतर डीपी बसून दिली नाही. त्यामुळे शेतकरी शिवाजी काकडे यांनी पैसे मागितले असता पैसे देखील दिले नाही. याप्रकरणी शेतकरी शिवाजी काकडे यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी २९ एप्रिल रोजी रात्री सायंकाळी ७ वाजता ३  जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.

Protected Content