करमाड येथील तरूणाला बेदम मारहाण; तीन जणांविरोधात गुन्हा


पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील करमाड येथे धरणातील मासे चोरीच्या कारणावरून तरूणाला तीन जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील करमाड येथील धरणाजवळ ठानसिंग मोहन भिल (वय-४०) रा. करमाड ता. पारोळा हा कामाच्या निमित्ताने १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता करमाड धरणावर गेला. त्यावेळी तु धरणातील मासे चोरी का करतो असे सांगून नाना तारसिंग भिल, गुलाब नामदेव पाटील, बापु रामचंद भिल सर्व रा. करमाड खुर्द ता. पारोळा यांनी लाकडी काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी ठानसिंग भिल यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय भोई करीत आहे.