Home क्राईम पुन्हा खुनाने हादरले जळगाव : तरूणाचा भोसकून खून

पुन्हा खुनाने हादरले जळगाव : तरूणाचा भोसकून खून

0
111

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आज रात्री पुन्हा एकाचा खून झाल्याने परिसर हादरला आहे.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ येथे असलेल्या गोलानी मार्केट येथील गायत्री फुल भांडारजवळ रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका तरूणावर काही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत मृत तरूणाची ओळख पटलेली नव्हती. तर, पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळी चॉपरचे कव्हर मिळून आले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलिसाचा घटनांसाठी दाखल झाले आहे.


Protected Content

Play sound