भोपाळ चोरी प्रकरणी फरार दोघे भुसावळात जेरबंद

 

भुसावळ, प्रतिनिधी । भोपाळ येथे रेल्वेतून चोरी करून पसार दोघां आरोपींना शहर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान जेरबंद केले .

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकारी यांनी शुक्रवार २८ रोजी पहाटे दिड वाजेच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबवीत असताना रेल्वे हॉस्पीटलच्या कडेला संशयीत झाडाच्या आडोशाला बसले असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. राजकुमार कडू दवडे (वय २३), रेल्वे स्टेशनजवळ, नेपानगर व समीर शाह जब्बार शहा (वय १८), दिनदयाल नगर, भुसावळ आरोपींची नावे असुन झडती दरम्यान लेडीज पर्स, फायटर, दोन हजार शंभर रुपये रोख, १० इंच लांबीचा व स्टीलची मूठ असलेला चाकू तसेच दोन सोन्याच्या बांगड्या त्यांच्याकडे सापडल्या .भोपाळ येथे रेल्वेतून चोरी करून पसार झाले होते पोलिसांनी कोम्बिंग दरम्यान त्यांना जेरबंद केले. आरोपींनी समाधानकारक खुलासा न दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.

Protected Content