पाचोरा बाजार समितीची निवडणूक आमदार किशोर पाटील यांची सरशी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोऱ्यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १८ जागांसाठी झाली होती. यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलने कपबशी चिन्ह घेऊन निवडणुक लढविली होतीश्.

यात आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलला विकास सोसायटीच्या मतदार संघाचे पाटील गणेश भिमराव, (६०६) पाटील प्रकाश अमृत (५६९), महिला राखीव पाटील पुनम प्रशांत – (६९७) भटक्या विमुक्त जाती जमाती पाटील लखीचंद प्रकाश – (५४१) ग्रामपंचायत सर्वसाधारण पाटील सुनील युवराज(४३६), ग्राम पंचायत आर्थिक दुर्बल घटक पाटील राहुल रामराव,(४४९) अनुसूचित जाती जमाती तांबे प्रकाश शिवराम – (४५०) व्यापारी मतदार संघ शिसोदिया मनोज प्रेमचंद – (१३४), हमाल मापाडी मतदार संघ पटेल इसुफ भिकन – (१०९) अशा ९ जागा निवडून आल्या. महाविकास आघाडीच्या छत्री चिन्हावर निवडणूक लढविलेल्या वि.का. सोसायटी सर्व साधारण मतदार संघ – पवार प्रशांत दत्तात्रय – (५९७) पाटील विजय कडू – (४७६), पाटील शामकांत अशोक – (५२४), महाजन मनोज उत्तमराव – (४८७), इतर मागासवर्गीय मतदार संघ – मराठे उद्धव दत्तू – (५७९) ग्राम पंचायत सर्वसाधारण गटातुन – पाटील निळकंठ नरहर – (४५९), व्यापारी मतदार संघ – संघवी राहुल अशोक – (१०२) अशा महाविकास आघाडीला ७ जागा मिळाल्या.

भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व त्यांचे काका सतीष शिंदे यांनी भाजपा पुरस्कृत स्वतंत्र पॅनल तयार केले होते मात्र त्यांना विकास सोसायटीच्या मतदार संघ – शिंदे सतीष परशुराम – (६०४) व अमोल शिंदे यांच्या आई शिंदे शिंदुताई पंडितराव (५८६) या दोन जागांवर समाधान मानावे लागले.

फेर मतमोजणीत गेला वेळ
पाचोरा बाजार समितीच्या मतमोजणी वेळी तीन वेळा फेर मतमोजणी करण्यात आली यात विका सोसायटी महिला राखीव मतदारसंघील पाटील शिंदे गटाच्या अर्चना संजय पाटील यांना सहा मते कमी मिळाल्याने त्यांनी भाजपाच्या शिंदुताई पंडितराव शिंदे ह्या विजयी झाल्याने फेरमोजनी केली मात्र त्यात शिंदूताई पंडितराव शिंदे विजयी घोषित करण्यात आले. भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातील पाटील लखीचंद प्रकाश हे सहा मतांनी विजयी झाल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी परदेशी गणेश भरतसिंग यांनी फेरमतमोजनी साठी अर्ज केला होता. यात पाटील लखीचंद यांना फेरमतमोजनी अंती विजयी घोषित केले.‌हमाल मापाडी मतदार संघात पटेल इसुफ भिकन हे दोन मतांनी विजयी झाले होते. मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी हटकर समाधान पुंडलिक यांनी आक्षेप घेतला त्यावेळी फेर मतमोजणीत पटेल इसुफ भिकन यांना विजयी घोषित करण्यात आले.

तीन अंगठ्याने झाला पराभव
‌हमाल मापाडी मतदार संघाचे समाधान पुंडलीक हाटकर यांना तीन मतदारांनी अंगठ्याचा ठसे उमटवून मतदान केले होते. हटकर यांना १०७ मते मिळाली होती मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी पटेल इसुफ भिकन यांना १०९ मते मिळाली होती निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव सुर्यवंशी यांनी तीन अंगठ्याचे ठसे दिलेल्या पत्रिका बाद केल्याने इसुफ भिकन यांना यांना शेवटच्या क्षणी विजयी घोषित करण्यात आले, आमदार किशोर पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलच्या १८ पैकी ९ जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून निवडून उत्सव साजरा केला.

Protected Content