यादव विठ्ठल सिनकर निवृत्त सेवा संघ पुरस्काराने सन्मानित

पाचोरा, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य, निवृत्त सेवा संघाचा उत्कृष्ट सामाजिक सेवेच्या कार्याचा पुरस्कार यादव विठ्ठल सिनकर यांना नुकताच पुणे येथे प्रदान करण्यात आला.जळगाव जिल्हयातून यादव सिनकर एकमेव पुरस्कार विजेते ठरले आहेत. पुणे येथे आयोजित कार्यक्रमात यादव सिनकर यांना सपत्नीक पुरस्काराने गौरविण्यात आले.

पाचोरा येथील सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक, जि. प. पुरस्कृत आदर्श शिक्षक तथा निवृत्त सेवा संघाचे कोषाध्यक्ष यादव विठ्ठल सिनकर हे निवृत्त सेवा संघाच्या माध्यमातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे संघाच्या अनेक सदस्यांना शासन दरबारी न्याय मिळाला आहे. तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा कायम पुढाकार व सहभाग असतो. त्यांच्या या अतुलनीय कार्याची महाराष्ट्र राज्य निवृत्त सेवा संघाच्या पुणे येथील कार्यालयाने दखल घेत त्यांना निवृत्त सेवा कार्याचा पुरस्कार निवृत्त संघाचे राज्याध्यक्ष एन. डी. मारणे, सरचिटणीस लक्ष्मण देवजी टेंगे, पुणे जिल्ह्याचे कोषाध्यक्ष वागळे, बारामतीचे वावळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघाचे अध्यक्ष सदाशिव सोनवणे, विजय सागर सह मान्यवर उपस्थित होते. सदर पुरस्कारात यादव सिनकर यांना गौरव पत्र, सन्मान चिन्ह, शाल व रोख रक्कम असा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यादव सिनकर यांना नोकरी सेवा काळातही सन-१९९७ मध्ये तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, सन- १९९९ मध्ये जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार प्राप्त यादव सिनकर यांचे पाचोरा तालुका अध्यक्ष विजय सागर, उपाध्यक्ष दिलीप पाटील, कार्याध्यक्ष सतिष तोडकर, जिल्हा निवृत्त संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Protected Content