मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई : सात वाळूचे ट्रॅक्टर्स पकडले

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | येथील पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आज पहाटे धडक कारवाई करून सात ट्रॅक्टर्स पकडून वाळू तस्करांना दणका दिला आहे.

या संदर्भात वृत्त असे की, तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्याने यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. या अनुषंगाने काही ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून वाळूची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मुक्ताईनगरचे पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांना मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी पथक तयार करून आज पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान धडक कारवाई केली.

या पथकाने शहरातील बर्‍हाणपूर रोडपासून सुरूवात करून पिंप्रीनांदू येथील पुलापर्यंत एकूण सात ट्रॅक्टर्स ताब्यात घेतले असून यांच्या चालकांनाही अटक करण्यात आली आहे. या संदर्भात दुपारपर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेवाळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली. दरम्यान, या कारवाईमुळे वाळू तस्करांना जोरदार हादरा बसल्याचे मानले जात आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!