असारबारी बुद्रुक येथे रिपाई शाखेची स्थापन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी गाव असारबारी बुद्रुक या आदिवासी समाजाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची शाखा स्थापन झाली असुन यावेळी पक्षाच्या फलकाचे अनावरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाने यावल तालुका अध्यक्ष विष्णू भाऊ पारधे यांनी सर्व आदिवासी समाजाचे संघटन करून त्या आदिवासी बांधवांचे अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लावून त्यांच्या ज्या-ज्या समस्या आहेत त्या समस्यां आम्ही ज्या जागेवर राहत आहात ते जागा नावावर करण्यात यावी. तसेच ३० ते ३५ वर्षापासून घरकुल नाही रेशन कार्ड नाही धान्य मिळत नाहीत गॅस मिळत नाहीत विजेची समस्या आहे. पाण्याची सुविधा नाही असे अनेक प्रश्न आदिवासी बांधवांचे असल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी एक संकल्प केला. सर्व सातपुडा पायथ्याशी असलेले यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या तात्काळ समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यावतीने आदिवासी ग्रामस्थांच्या समस्या तात्काळ शासन दरबारी मांडणार आहेत.

त्याकरिता जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी आदिवासी बांधवांना हक्काचा निवारा मिळवून देण्याचे आपण युद्धपातळीवर शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित आदीवासी ग्रामस्थांना दिले. या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधवांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सदैव यांच्या सोबत राहील असे सांगितले सर्व आदिवासी समाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटासोबत राहतील अशी आदिवासी समाजाने गवाही देऊन त्या आदिवासी आसारबारी या गावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची नुकतीच शाखाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी रिपाईचे यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे, बाबूलाल पटेल माजी सैनिक जिल्हा अध्यक्ष सुनील तायडे, नवीन शाखेचे अध्यक्ष लल्लूसिंग बारेला, उपाध्यक्ष काळूसिंग बारेला, महिला अध्यक्ष रेखाबाई बारेला, रेखाबाई रमेश बारेला, ग्रामपंचायत सदस्य पप्पू भालेराव, भालोद अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष राजू तडवी तसेच आदिवासी पाड्यातील संपूर्ण आदिवासी महिला व पुरुष रिपाईचे कार्यकर्ते मोठया संख्येत या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Protected Content