Home Cities एरंडोल वारकरी मंडळाच्या एरंडोल तालुका उपाध्यक्षपदी गोपाल महाराज यांची नियुक्ती

वारकरी मंडळाच्या एरंडोल तालुका उपाध्यक्षपदी गोपाल महाराज यांची नियुक्ती

0
42

कासोदा ता.एरंडोल, प्रतिनिधी । अखिल भारतीय वारकरी मंडळ जळगाव जिल्हाची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून. त्यात एरंडोल तालुक्यातील युवा किर्तनकार गोपाल महाराज पाटील हणुमंतखेडे बु || यांची एरंडोल तालुक्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष.गुरूवर्य प्रकाश महाराज बोधले यांनी युवा किर्तनकार गोपाल महाराज पाटील यांची एरंडोल तालुक्याच्या उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. वारकरी संप्रदायातील सर्व कीर्तनकार मंडळी व सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी गोपाल महाराज पाटील यांना शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे खान्देश विभागीय उपाध्यक्ष गो प्रेमी गजाननजी महाराज वरसाडेकर व जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भागवताचार्य मुकेश महाराज पारगावकर यांनीही महाराज गोपाल पाटील यांना शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound