कमी पटसंख्या असलेल्या जि.प.शाळा बंद होणार !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने नविन वर्षापासून नविनशैक्षणीक धोरण लागु करण्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतू शासनाने पर्यायी मार्ग काएून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पासून वाचविण्यात यावे अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नविन शैक्षणीक धोरणानुसार यावल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या 2O व वीस पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असल्यास त्या शाळा बंद करण्याच्या शासन विचाराधीन असल्याने तालुक्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या दुर्गम भागातील चार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसह 19 शाळांमधे २० व २० पेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळांचा समायेश आहे. शासनाने या शाळा बंद केल्या तर दुर्गम भागातील आदीवासी विद्यार्थ्यांंची गैरसोय होणार आहे.

यावल तालुक्यात शासनाच्या संभाव्य निर्णयानंतर दुर्गम भागातील चार शाळांसह १९ शाळेत असलेली पटसंख्या पुढील प्रमाणे टेंभी- कुरण प्राथमिक शाळा १०,टाकरखेडा १५, वाघळूद २०, साखर कारखाना फैजपूर १३, उर्दू शाळा बामनोद १९,चिखली बुद्रुक १८, नावरे १४, चारमळी ( आदीवासी दुर्गम भाग) १९, वड्री (उर्दू शाळा ) १४, इचखेडा १६, पाझर तलाव ( आदीवासी दुर्गम भाग) १३, मोर धरण ११, वीटवे ( हिंगोणा जवळ)१४, भोरटेक १९,करंजी १८,पाडळसे (उर्दू शाळा ) १७, पिळोदा खुर्द २०,लंगडा आंबा ( आदीवासी दुर्गम भाग) १४,धुपघाट ( आदीवासी दुर्गम भाग) ९ या शाळांचा समावेश आहे. ही माहिती येथील यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नईम शेख यांनी दिली आहे.

Protected Content