हत्या प्रकरणात राम रहीम दोषी

पंचकुला – रणजीत सिंह हत्या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने सुनारिया तुरुंगात बंद असलेल्याहरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमसह पाच आरोपींना दोषी ठरवलं आहे. आता यावर 12 ऑक्टोबर रोजी सर्व दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.

शुक्रवारी रणजीत हत्या प्रकरणातील आरोपी डेराप्रमुखी गुरमीत राम रहीम आणि कृष्ण कुमार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले. त्याचवेळी आरोपी अवतार, जसवीर आणि सबदिल थेट न्यायालयात हजर होते. सीबीआय कोर्ट यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी या प्रकरणी निकाल देणार होता. पण, काही कारणास्तव निकाल राखून ठेवला. 19 वर्षे जुन्या या प्रकरणाची अखेरची सुनावणी 12 ऑगस्ट रोजी झाली होती. सीबीआय न्यायाधीश डॉ.सुशील कुमार गर्ग यांच्या न्यायालयात सुमारे अडीच तासांच्या चर्चेनंतर आरोपींना दोषी ठरवलं. या प्रकरणात राम रहीम, कृष्ण लाल, सबदील, अवतार आणि जसबीर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी इंदरसेनचा मृत्यू झाला आहे.

रणजीत सिंह यांची 2002 मध्ये हत्या झाली होती. तो डेरामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करायचा. रणजीतच्या हत्येप्रकरणी डेरा प्रमुख राम रहीमला आरोपी बनवण्यात आलं होतं. अनेकदा न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली होती. पण, सीबीआयने 2003 मध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि 2007 मध्ये न्यायालयाने आरोप निश्चित केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!