पिंपळे व ढेकू रोड परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमीपूजन

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील पिंपळे व ढेकू रोड परिसरातील रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले.

यावेळी आ. पाटील म्हणाले की, पिंपळे रोड व ढेकू रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 7, 8, 13 व 14 म्हणजे माझ्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या नागरिकांचा परिसर असून येथील संपूर्ण कॉलन्यांमधील प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत चकचकीत रस्ते हवेत हेच माझे ध्येय आहे,आणि माझे हे ध्येय सर्वांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर पूर्ण झालेले दिसेल असा विश्वास आ.अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक 8 मध्ये स्वामी विवेकानंद नगर येथील अँड कै. उमाकांत पाटील ते श्री. विंचूरकर सर यांच्या घरापर्यंत  आणि आल्हाद नगर, श्रीकृष्ण कॉलनी, रमण चौधरी ते भागवत गुरुजी यांच्या घरापर्यंत ट्रिमिक्स रस्ता काँक्रीटिकरणाचे आमदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या परिसरात 25 वर्षांपासून रस्तेच नसताना आमदार अनिल पाटील यांनी 30 लाख निधीतून आधुनिक पद्धतीचे ट्रीमिक्स रस्ते मंजूर केल्याने नागरिकांच्या आग्रहास्तव अतिशय थाटात हा भूमिपूजन सोहळा पार पडला, भूमिपूजन नंतर आमदारांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मार्केटच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, मार्केट प्रशासक एल.टी. पाटील, प्रा. सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रभागाच्या नगरसेविका ॲड. चेतना पाटील, ॲड. यज्ञेश्वर पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन हे दोन्ही रस्ते आमदारांनी मंजूर केले आहे.

आपल्या मनोगतात पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की पिंपळे रोड व ढेकू रोड परिसराकडून नेहमीच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव झाला आहे,यामुळे पुढे पालिका निवडणूक म्हणून काही विकासाचे आश्वासन मी देत नसून हा परिसर माझा स्वतःचाच हेच मी गृहीत धरले आहे,यंदा जोरदार पावसामुळे येथील अनेक परिसरात पाणी शिरले,नागरिकांचे हाल देखील मी डोळ्यांनी पाहिले त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी देखील जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार मी केली असून त्याव्यतिरिक्त देखील उपाययोजना करण्याचे प्रामाणिक प्रयत्न माझे सुरू आहेत,त्यामुळे काळजी करू नका ती समस्या तर सुटेलच मात्र आगामी काही काळात रस्त्या बाबत कुणाचीही तक्रार राहणार नाही अशी स्पष्ट ग्वाही आमदारांनी दिली.,व या प्रभागांच्या नागरिकांसाठी नगरसेविका अँड चेतना पाटील व अँड यज्ञेश्वर पाटील यांनी दाखविलेल्या तळमळीचेही आमदारांनी विशेष कौतुक केले.

यावेळी आमदारांनी नंतर नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेत पालिकेच्या माध्यमातून किंवा आपल्या स्तरावर लवकरच त्याचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.याप्रसंगी प्रभागातील रहिवासी प्रा.वंदना पाटील तसेच विठ्ठल पाटील, एम.आर.पाटील, मधुकर शिरसाठ, प्रा.अशोक पवार, भागवत गुरुजी,अँड प्रशांत संदांशिव,रमेश पाटील, संभाजी पाटील, प्रा.अशोक पाटील, अनंत भदाणे, विलास दोरकर, दाभाडे सर, लोटन पाटील, एस.एन.पाटील, दिलीप पाटील , बी.आर.पाटील, बी.एन.पाटील, दीपक सोनवणे, आरिफ पठाण,गणेश पाटील, प्रकाश पाटील, प्रदीप पाटील, शुभम बोरसे याशिवाय नवयुवक मित्र परिवार ,स्वामी मित्र मंडळ व परिसरातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. प्रास्ताविक डी. ए. धनगर तर आभार प्रदर्शन अनंत भदाणे यांनी केले.अत्यंत आवश्यक असणारे हे दोन्ही रस्ते आणि ते देखील ट्रीमिक्स पद्धतीचे मंजूर करून दिल्याने सर्व उपस्थित नागरिकांनी आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले.

Protected Content