Home Cities अमळनेर अमळनेरात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घराचे कुलूप तोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

अमळनेरात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घराचे कुलूप तोडून ७० हजारांचा ऐवज लंपास


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील समर्थ नगर परिसरात घरफोडीची एक गंभीर घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत प्रकाश विसपुते (वय ४७, रा. अमळनेर) हे आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ८ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घर बंद केले होते. त्यानंतर १२ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी संधी साधून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातून ५० हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम सोन्याचे कानातले, ८ हजार रुपये किमतीची लक्ष्मीची चांदीची मूर्ती, ८ हजार रुपयांची गणपतीची चांदीची मूर्ती, १ हजार ६०० रुपयांची चांदीची समई आणि २ हजार ४०० रुपयांचे चांदीचे फुलपात्र असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हेमंत विसपुते हे घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे समोर आले.
याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound