Home Cities जळगाव डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘समन्वय २०२६’चा जल्लोषात समारोप

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘समन्वय २०२६’चा जल्लोषात समारोप


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस आग्नेय बॅचतर्फे आयोजित ‘समन्वय २०२६’ सप्ताहाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. आठवडाभर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांनी सजलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

दि. १२ ते १८ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या या सप्ताहाची सुरुवात आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाने झाली. त्यानंतर विविध उपक्रमांची मालिकाच राबवण्यात आली. दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करून विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवही व्यक्त केली. याशिवाय टीचर डे, प्रोमो शो आणि डीजे नाईट यांसारख्या कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

समारोप समारंभाला माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, अनिल पाटील, किवा पाटील, सारा पाटील, वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित तसेच रजिस्ट्रार प्रमोद भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर धन्वंतरी पूजन व स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविधतेचा संगम पाहायला मिळाला. भरतनाट्यम, कथ्थक, पंजाबी, राजस्थानी, दक्षिण भारतीय नृत्यप्रकारांसह लावणी, हिप-हॉप, फ्यूजन आणि बॉलिवूड नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय गायन, जॅमिंग सेशन, रेट्रो बॉलिवूड सादरीकरण आणि स्किट्स यांसारख्या उपक्रमांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण सप्ताह संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तल्हा जमादार, राजनंदिनी पाटील, अंजली महाजन व साक्षी पिसे यांनी केले. तर वैष्णवी वानखेडे, ओंकार शेलार, कल्याणी चौधरी, अपूर्व पाटील, मुस्कान सिद्दीकी, रुत्विक भुजबळ, वेदांत काकडे, अंजली गुप्ता, चेतन माळी, विराज पाटील व सृष्टी माहुलकर यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी स्पोर्ट्स ट्रॉफीचे वितरणही करण्यात आले.


Protected Content

Play sound