पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात 

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूलमध्ये सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्था आयोजित शालेय स्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत दर्शना सावकार पाटील (प्रथम), नम्रता संतोष जाधव (द्वितीय) तर तृतीय क्रमांक प्रियंका जितेंद्र पाटील या विद्यार्थीनींनी पटकावला. विजयी स्पर्धकांना शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली.

याप्रसंगी रवींद्र जाधव, चंद्रकांत पाटील, संगीत शिक्षक सागर थोरात उपस्थित होते. स्पर्धेत यशस्वी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष तथा आ. दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन विलास जोशी यांचेसह शाळेतील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्यात. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Protected Content