वृध्दाश्रमासाठी जागा दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून युवराज सोनवणे यांचा सन्मान

यावल-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी ।  जागतिक जेष्ठ नागरिक दिना निमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात यावल तालुक्यातील सातोद येथील राहणारे युवा समाजसेवक युवराज सोनवणे यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

जेष्ठ नागरिक या दिना निमित्ताने आयोजीत कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग योगेश पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी  जिल्हा परिषद जळगावचे अनिकेत आणी जळगाव मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांचे उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.

कोळवद (सातोद ) तालुका यावल येथे उभारण्यात येणाऱ्या वृद्धाश्रमासाठी सातोद येथील समाजसेवक युवराज समरस सोनवणे यांनी त्यांच्या स्वताची दहा हजार स्केअर जागा उपलब्ध करून दिली असुन या ठीकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागाच्या माध्यमातुन वृद्धाश्रम बांधले जाणार आहे.

या परिसरात प्रथमच दहा हजार स्केअर फूटच्या सुरु करण्यात येणाऱ्या वृद्धाश्रमाचे लवकरात भूमिपूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात परिवर्तन प्रवर्तक बहुजन फौंडेशन यावल (NGO) चे संस्थापक अध्यक्ष युवराज समरस सोनवणे यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे हस्ते प्रशस्ती पत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जळगांव या ठिकाणी संपन्न झाला मार्गदर्शन जेष्ठ विधितज्ज्ञ सुशील अत्रे यांनी वृद्धा साठींच्या असलेले अधिकारा बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तर वैद्यकीय तज्ञ डॉ.शशिकांत गाजरे यांनी वृद्धानी म्हातारपणात आरोग्याची आपली काळजी कशी घ्यायची या बद्दल मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी यांनी या प्रसंगी विविध प्रकार च्या योजनाची माहिती दिली व वृद्धाचे गावागावात व वॉर्डा वार्डात मंच स्थापन करण्याचे आवाहन देखील केले. तसेच जेष्ठ नागरिक संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष डी.टी.चौधरी व जेष्ठ नागरिक संघांचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष जगतराव पाटील यांनी सुद्धा जेष्ठ नागरिकांच्या संघटनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.    कार्यक्रमास परिवर्तन फौंडेशनचे पदाधिकारी  मुकेश सोनवणे व विशाल सोनवणे व मिलिंद तायडे उपस्थित होते.  या कार्यक्रमास सर्व उपस्थितांचे आभार सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र कांबळे  यांनी मानले.

Protected Content