कळमसरे ग्रामपंचायतकडून कुपोषित बालकांना पौष्टिक किराणा किटचे वाटप

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अमळनेर येथील ग्रामपंचायतीकडून ग्रामनिधी मधील महिला बालकल्यांनचा दहा टक्के निधी मधुन गावातील ७ कुपोषित बालकांना सुमारे १२ हजार रुपयांचे पोषण आहाराचे किराणा किटचे वाटप विस्तार अधिकारी सुरेश कठाडे तसेच सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र सिंग पाटील, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायतच्या राजीव गांधी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विस्तार अधिकारी श्री कठाडे यांनी शासनाच्या आदेशानुसार कुपोषण मुक्त भारत या अभियाना अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप करावे असे सुचविले. त्या अनुषंगाने कळमसरे  ग्रामपंचायत मार्फत सदर कार्यक्रम दरवर्षी घेतला जात असल्याचे ग्रामपंचायतीचे कौतुक केले. व यापुढे एकही कुपोषित बालक गावात आढळणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी नीमचे ग्रामसेवक जगदीश पवार तसेच रमेश चौधरी अंगणवाडी सेविका, पालक वर्ग तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content