प . वि.पाटील विद्यालयात मेहंदी कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थिनींसाठी मेहंदी काढण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यशाळेमध्ये सर्वप्रथम विद्यार्थिनींकडून कागदावर मेहंदी मध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध नक्षीकामांचा सराव करून घेण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष मेहंदी चा कोन कसा वापरावा याबद्दल माहिती देण्यात आली व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनींकडून इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींच्या हातावर मेहंदी काढण्याचा सराव करून घेण्यात आला. सदर कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यांनी सुंदर अशा नक्षी रेखांकनाच्या माध्यमातून मेहंदी मध्ये उतरवल्या. नाविन्यपूर्ण अशा या कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींनी खूप आनंद घेतला व उत्साहाने सहभाग घेऊन मेहंदीचे प्रशिक्षण पूर्ण केले.

कार्यशाळेसाठी उत्कृष्ट मेहंदी प्रशिक्षक चंचल जंगले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव, योगेश पाटील तसेच गायत्री पवार यांनी मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली केले तर सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Protected Content