विद्यार्थिनी-शिक्षिका वाद पोहचला पोलीस ठाण्यात (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 12 21 at 6.08.09 PM

जळगाव, प्रतिनिधी | येथील निमजाई हेल्थकेअर फौंडेशनमध्ये प्रधानमंत्री योजनेतील रक्कम बँक खात्यात जमा होईल का ? अशी विचारणा केल्यावर विद्यार्थिनीला शिक्षिकेने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोघींनी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारनुसार जिल्हा पोलीस स्टेशन दाखल करण्याचे काम सुरु होते.

निमजाई हेल्थकेअर फौंडेशनमध्ये फॅशन डिझाईनचे शिक्षण घेत असून प्रधानमंत्री योजनेअंतर्गत पैसे मिळावेत अशी मागणी फौंडेशनकडे केली असल्याचे आज एका विद्यार्थिनीने सांगितले. मात्र, असे कोणत्याही कोर्सला पैसे मिळत नसल्याचे तिला सांगण्यात आले. शितल पाटील व भूषण बक्से यांना मग तुम्ही माझ्या पासबुकची झेरॉक्स का घेतली असा प्रश्न विद्यार्थिनीने विचारल्याने वाद उफाळून दोघांनी एकमेकास मारहाण केली. यावरून वाद वाढून हा वाद जिल्हापेठ पोलिसात आला होता. यावेळी विद्यार्थिनीस मारहाण झाल्याने तिच्या कुटुंबीय व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तर शितल पाटील यांनी त्यांची बाजू मांडताना सांगितले की, आज राज्य शासनातर्फे आज परीक्षा घेण्यात येत होती. यावेळी ती विद्यार्थिनी माझ्या अंगावर धाऊन आली असा आरोप केला. मला विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान करवयाचे नसल्याची मत शितल पाटील यांनी मांडले आहे.

Protected Content