जळगावात जिल्हास्तरीय मूल्यवर्धन मेळाव्याचे आयोजन

mulyawardhan

जळगाव प्रतिनिधी । शालेय शिक्षण विभाग आणि मुथा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानाने राज्यातील जिल्हापरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यासाठी मूल्यवर्धन मेळावा 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शहरातील श्री छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण विभाग आणि मुथा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानाने राज्यातील जिल्हापरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यासाठी मूल्यवर्धन मागील ४ वर्षापासून यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. आतापर्यंत सर्व ६७००० शाळामध्ये मूल्यवर्धन टप्याटप्प्याने सुरु करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे शिक्षकामध्ये आणि विद्यार्थ्यांध्ये सकारात्मक बदल घडत आहेत. जिल्हापरिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची व शिक्षकांची प्रचंड मेहनत सर्व सामान्य जाणते पर्यंत पोहोचावी व त्यांचा उत्साह वाढावा म्हणून जिल्हापरिषद अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय शाळेतील शिक्षक, प्रेरक, मुख्याध्यापक केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, प्राचार्य या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी मूल्यवर्धन वर आधारित पोस्टर्स तयार केलेली आहे. त्या महाराष्ट्रभरातील पोस्टर्सचे प्रदर्शन 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत या तीन दिवसीय असून सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. तरी या मेळाव्याचा जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळा, खाजगी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक लाभ घ्यावा असे आवाहन मुथा फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष विनय पारख, जिल्हाप्रमुख तेजस कावडीया यांनी केले आहे.

Protected Content