लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुरुवारी, १५ मे रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका २४ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात पीडित तरुणी आपल्या कुटुंबासोबत राहते. याच दरम्यान हरी विठ्ठल नगर येथे राहणारा सनी प्रमोद उमक (वय २४) याच्याशी तिची ओळख झाली. ओळखीनंतर संशयित आरोपी सनीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

अत्याचारानंतर आरोपी सनीने लग्नाला नकार दिला. या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी गुरुवारी १५ मे रोजी दुपारी ४ वाजता सनी उमक याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील करत आहेत.

Protected Content