अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी १४ मे रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. या संदर्भात गुरुवारी १५ मे रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. बुधवारी १४ मे रोजी सकाळी १० वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमीष दाखवत फूस लावून पळवून नेले. दरम्यान ही घटना लक्षात आल्यानंत आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला परंतु तिच्या बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुरुवारी १५ मे रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहे.