Home Cities अमळनेर जुन्या वादातून तरूणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

जुन्या वादातून तरूणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

0
172


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील तासखेडा येथील ३० वर्षीय तरूणाला जुन्या भांडणाच्या कारणावरून लाकडी दांडक्याने डोक्यावर, पाठीवर आणि पायावरून मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी ३० एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील तासखेडा गावात चेतन नाना ठाकूर वय २८ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता चेतन हा गावातील म्हशीच्या गोठ्यात काम करत असतांना जून्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे मंगल डोंगर भिल, सुनंदा मंगल भील, सुरेश डोगर भील, जगदीश मंगल भील, सतीष मंगल भील, किसन महारू भिल, आशाबाई महारू भिल, ज्योती लोटन भील, मोनी नाना भिल, वंदाबाई सोमा भिल, अजय प्रताप भील, दिपक नाना भिल सर्व राहणार तासखेडा ता.अमळनेर यांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने डोक्यात, पाठीवर आणि पायावर बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी बुधवारी ३० एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता चेतन ठाकूर यांने अमळनेर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहे.


Protected Content

Play sound