Home Cities जळगाव जळगावात नाट्य शिबीराचे आयोजन

जळगावात नाट्य शिबीराचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील लहानग्यांसाठी उन्हाळी सुट्टीचा खास अनुभव देणारी नाट्य कार्यशाळा २ मे ते ११ मे दरम्यान मेहरूण तलावाजवळील मलारा हाऊस येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये केवळ निवडक २५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून, वय वर्षे ५ ते १६ दरम्यानच्या मुलांना सहभागाची संधी दिली जाणार आहे.

या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ अभिनयच नव्हे, तर वाचन, खेळ आणि मुलांना व्यक्त होण्यासाठी विविध सृजनात्मक उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण कार्यशाळेचे मार्गदर्शन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) – TIE विभागाचे प्रशिक्षक योगेश पाटील करणार आहेत. त्यांच्या अनुभवातून मुलांना केवळ अभिनयाची प्राथमिक माहितीच नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळणार आहे.

दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत होणाऱ्या कार्यशाळेसाठी नोंदणीची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५ असून, लवकर नाव नोंदवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यशाळेतील सहभागासाठी अधिक माहितीसाठी योगेश पाटील (8698068826) किंवा हर्षल पाटील (9403909087) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी सांगितले आहे.

नोंदणीसाठी इथे क्लिक करा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScjgi3vLauSBPkzvufeX2XManalf8zMJ4FrmipH9uFi5XpxZg/viewform?usp=header


Protected Content

Play sound