अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर जप्त

यावल प्रतिनिधी । महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकदारांच्या विरूध्द धडक कारवाई करत दोन डंपर आणि ट्रॅक्टर्स जप्त केले आहेत.

याबाबत वृत्त असे की, यावल तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन महसुलच्या पथकाने अवैध गौण खनिजाच्या विरूद्ध उघडलेल्या मोहीम अंतर्गत यावल तालुक्यातील किनगाव येथील मंडळ अधिकारी सचिन जगताप व बामणोद मंडळ अधिकारी मिलींद देवरे, मंडळ अधिकारी शेखर तडवी व तलाठी, साकळीचे मंडळ अधिकारी पी. ए. कडनोर यांनी वाळु माफीयांच्या विरुद्ध धडक कारवाई केली आहे.

या मोहिमेत विनापरवाना अवैध मार्गाने वाळुची वाहतुक करणारे दोन डंपर व दोन ट्रॅक्टर तालुक्यातील विविध क्षेत्रातुन कार्यवाहीसाठी जप्त करण्यात येवुन पुढील दंडात्मक कार्यवाही करीता यावल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज ची विनापरवाना वाहतुक करणार्‍या वाळु माफीयाचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.