Home क्राईम परमबीरसिंग गोत्यात; अ‍ॅट्रॉसिटीसह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल

परमबीरसिंग गोत्यात; अ‍ॅट्रॉसिटीसह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल

0
101

अकोला प्रतिनिधी । थेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकार्‍यांवर येथील सिटी कोतवाली स्थानकात अ‍ॅट्रॉसिटीसह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परमबीर सिंग यांनी ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलिस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. या सोबतच परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली.

या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह तब्बल २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound