वडजी गावात व्यापक कोरोना तपासणी मोहिम

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडजी येथे व्यापक कोरोना तपासणी मोहिम राबविण्यात आली असून यात बाधीत आढळणार्‍यांवर वेळीच उपचार करण्यात आले आहेत.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वडजी येथे मार्च व एप्रिलच्या पहील्या आठवड्यात कोरोनाने कहर केला होता. याची दखल घेऊन ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने तत्काळ कोरोना तपासणी मोहिम हाती घेतली. याच्या अंतर्गत गावात तब्बल १ हजार ४०० जणांच्या चाचण्यात करण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागाच्या सहकार्याने वडजी ग्रामपंचायतीने गावात स्क्रिनिंगला सुरूवात केली. तर कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढविले. आरोग्य सेवक हरीश महाजन, आरोग्य सेविका हरणे व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविकाच्या माध्यमातुन प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रातांधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी आर.एम.वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील, डॉ.प्रतिक भोसले यांनी गावाला भेट देत आढावा घेतला. त्यानंतर गावात कोरोना चाचण्या घेण्यासाठी ५-६ ठिकाणी कॅम्प लावण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार कोरोना चाचण्याचे शिबीर घेण्यात आले. त्यानंतरही घरोघरी जाऊन चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे कोरोना रूग्ण समोर आले. त्याच्यांवर वेळीच उपचार करण्यात यश आले.

वडजी गावामध्ये गेल्या १५ दिवसात जवळपास १ हजार ३९५ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आरोग्य सेवक हरीष महाजन यांनी तर लोकांच्या घरोघरी जाऊन टेस्ट केल्या. त्यात ७२ जण पॉझिटीव्ह आढळून आले होते. त्यात रोकडा फार्म येथे १३ जण बाधित आढळून आले. ५३ जणांनी कोरोनावर मात केली असुन १४ जण उपचार घेत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करून घेतल्याने बाधित रूग्णावर वेळीच उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे मृत्युदरांत घट झाली. ग्रामीण भागात एवढ्या मोठ्याप्रमात चाचण्या करणारे वडजी हे कदाचित एकमेव गाव आहे. असे
तहसिलदार सागर ढवळे यांनी सांगितले.

फवारणीसाठी पुढाकार

वडजी गावात कोरोनाने कहर केल्याने ग्रामपंचायतीने तातडीने पावले जंतूनाशकाची ट्रक्टरव्दारे फवारणी केली. बाधित रूग्णांना जेवढे शक्य आहे तेवढी दवाखान्याच्या कामासाठी मदत केली. त्यांच्या भेटी घेऊन धीर देण्याचा प्रयत्न केला. गावात अधिका अधिक चाचण्या करण्यासाठी स्वत: ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे वडजीत सरू झालेला कहर थांबविण्यात वडजी ग्रामपंचायतीला यश आले. वडजी ग्रामपंचायतीच्या वतीने आगामी काळात ऑक्सिजन कॉन्सींटेटर घेण्याचे नियोजन सरपंच मनिषा गायकवाड, उपसरपंच सुरेखा पाटील व परीवर्तन पॅनलच्या सदस्यांनी केले आहे.

Protected Content