यावलच्या विद्यार्थिनींचे क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये यश

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आंतर विभागीय क्रॉस कंट्री स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी तिसरा क्रमांक पटकाविला.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथील शैक्षणिक वर्ष २०२२ -२३  च्या आंतर विभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाल यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजीत आंतर विभागीय क्रॉस कंट्री स्पर्धेत ६  मुलींनी सहभाग नोंदवला.या स्पर्धेत जळगाव विभागाच्या सर्व महाविद्यालयाच्या मुलींपैकी क्रॉस कंट्री स्पर्धेत यावल महाविद्यालयातील ६ मुलींनी क्रॉस कंट्री स्पर्धेत तिसरा क्रमांक यश प्राप्त केले. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या हस्ते मुलींना क्रॉस कंट्री स्पर्धेची ट्रॉफी देऊन अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार, डॉ. पी. व्ही. पावरा, डॉ.आर. डी. पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 

Protected Content