Home Cities जळगाव गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात जयप्रकाश काबरा यांचे प्रेरणादायी व्याख्यान

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात जयप्रकाश काबरा यांचे प्रेरणादायी व्याख्यान

0
39


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव व रोटरी क्लब ऑफ गोदावरी ३०३० यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मोटिवेशनल वक्ते व मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडचे जयप्रकाश काबरा यांनी ‘व्यवस्थापन: काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान दिले.

 

महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके यांनी जयप्रकाश काबरा यांचे शाल, श्रीफळ व स्मृतचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी जयप्रकाश काबरा यांच्या उपस्थितांना परिचय करून देताना सांगितले की सर रोटरी क्लबचे ३० वर्षापासून सदस्य आहेत. सरांना १७ वर्षांचा मानव संसाधन व्यवस्थापन मधील अनुभव आहे. तसेच आतापर्यंत त्यांनी ४३१ प्रायव्हेट व पब्लिक कंपनीमध्ये व्याख्यान दिलेले आहे.यावेळी जयप्रकाशजी काबरा यांनी सांगितले की, शिक्षक हा नेहमीच शिक्षक असतो. विद्यार्थ्यांना नेहमी ज्ञान देण्याचे काम शिक्षकाचे चालूच असते. त्यासाठी निरंतर वाचन, उदाहरण देणे ई. श्रम घ्यावे लागतात. खरे मॅनेजमेंट गुरू हे आर्य चाणक्य आहेत ज्यांनी चाणक्य नीति मध्ये प्रेरणा, वर्तन आदीबद्दल सर्व लिहिले आहे. मॅनेजमेंट हे एक अफाट मोठे क्षेत्र आहे. जगामधील सर्वात उत्कृष्ट व्यवस्थापक ही स्त्री आहे. जी घर सांभाळते, त्यांचे वेळेचे व्यवस्थापन चांगले असते, समस्या सोडवणे छान येते. विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे जेणेकरून यश प्राप्त होईल. काम करा पण ते काम करण्याचा दृष्टिकोन बदलवा. नकारात्मकता दूर करा व नेहमी सकरात्मक रहा. आपल्या बोलण्यामध्ये मधुरता ठेवा व डोकं नेहमी शांत ठेवा असे केल्याने कामात कुठलीही अडचण येत नाही. मैदान सोडून कधीही पळू नका. ऐकावे जनाचे करावे मनाचे. आव्हानांना नेहमी धैर्याने तोंड द्या. व्यवस्थापन ही एक कला आणि विज्ञान असल्याचे उदाहरणांसह स्पष्ट केले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या उपसंचालक डॉ. नीलिमा वारके यांच्यासह सर्व शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच MBA, BCA,BBA मधील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता पाटील यांनी केले. आभर प्रा. मिताली शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जयप्रकाश काबरा व रोटरी क्लबच्या सदस्य यांच्याहस्ते महाविद्यालयाजवळ सामाजिक बांधिलकी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली. यात प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुनिंब झाडांचा समावेश होता.

या कार्यक्रमास निर्मला काबरा, रोटरी क्लब ऑफ एलिट जळगावचे अध्यक्ष डॉ. पंकज शाह, रोटरी क्लब ऑफ एलिट जळगावचे सचिव निलेश झवर ,  राजीव बियाणी , सचिन चौधरी, संदीप असोदेकर, श्रीराम परदेशी उपस्थित होते.


Protected Content

Play sound