राज्य स्टेनोग्राफर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र स्टेट गव्र्हमेंट मोफुसिल स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूरच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची घोषणा झाली असून जिल्हा अध्यक्षपदी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ. सोमनाथ वडनेरे, उपाध्यक्षपदी जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रकाश सपकाळ, सचिवपदी कबचौउमविचे डॉ. महेंद्र महाजन यांची निवड झालेली आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील लघुलेखकांच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली असून मोफसिल राज्य स्टेनोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष हरीष वारुडकर आणि सरचिटणीस डी. डी. देशपांडे यांनी सदरहू निवडीस मान्यता दिलेली आहे.

 

जिल्हा कार्यकारिणी :

नवनियुक्त कार्यकारिणीत जळगाव जिल्ह्यातील विविध विभागातील लघुलेखकांचा सहभाग आहे. तो पुढील प्रमाणे अध्यक्ष डॉ. सोमनाथ वडनेरे (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ),  उपाध्यक्ष प्रकाश सपकाळ (जिल्हा व सत्र  न्यायालय, जळगाव), सचिव  डॉ. महेंद्र महाजन (कबचौउमवि), सहसचिव लक्ष्मण मुंडे, (शिक्षण (प्रा.) जिल्हा परिषद, जळगाव),कोषाध्यक्ष गंगाधर कदम (जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जळगाव), सह कोषाध्यक्ष भारत कुंडलिक भगत (जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), अमित मगन पाटील (जलसंपदा विभाग, जळगाव), दिलीप मोराणकर (अधिष्ठाता, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सिव्हील हॉस्पिटल, जळगाव), राजेश गीरधर बगे (कबचौउमवि,जळगाव )  चिंत्रांगा अनिल चौधरी  (कबचौउमवि,जळगाव), आदेश बारी (उपविभागीय अधिकारी कार्यालय, जळगाव) यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

 

शॉर्टहँड कला विकासासाठी कार्य :

शॉर्टहँड कौशल्य आत्मसात करुन विविध विभागात स्टेनोग्राफर्स म्हणून सेवारत स्टेनोग्राफर्स यांच्या समस्या, मागण्या व विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच आणि शॉर्टहँड विषयाच्या विद्याथ्र्यांच्या विकासासाठी राज्य असोसिएशन कार्य करीत असून ते  पुढे नेण्यासाठी ही नवनियुक्त कार्यकारीणी काम करीत असल्याचे डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य प्रथम लघुलेखकांचे संमेलन तसेच आम्ही सारे लघुलेखक  या लघुलेखकांच्या मेळाव्याद्वारे शॉर्टहँड कलेच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून सदरहू निवड झाल्याचेही ते म्हणाले.

 

Protected Content