विटांनी भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली; नागरिकांच्या सतर्कतेने दुर्घटना टळली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  इच्छादेवी चौक ते डीमार्ट दरम्यानच्या रस्त्यावर तांबापुरा येथे विटांनी भरलेले धावत्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याची घटना सकाळी घडली. यावेळी या रस्त्यावरुन काही चिमुकले जात होते, सतर्क नागरिकांनी चिमुकल्यांना वेळीच बाजूला नेले, त्यामुळे दुर्घटना टळली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील इच्छादेवी चौकातून डीमार्टकडे मंगळवारी सकाळी (एम.एच.१९ सी.झेड ०५७३ ) या क्रमांकांचे ट्रॅक्टर व (एमएच १९ सी १८०२) या क्रमाकांच्या ट्रॉलीसह जात होते. ट्रॉलीमध्ये वीटा भरलेल्या होत्या. तांबापुरा परिसरात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खड्डयाचा अंदाज न आल्याने वीटांनी भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. यात सर्व वीटा रस्त्यावर पडल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान ट्रॅक्टरची ट्रॉली उलटत असतांना याच ठिकाणाहून काही चिमुकले जात होते. या ठिकाणी असलेले कुणाल बागुल, आशिफ शाह, जमील शेख, विकास फुलपागरे, गजानन सोनार, विजय परदेशी, दिलबर शेख, इरफान खान या नागरिकांनी चिमुकल्यांना वेळीच बाजूला केले. त्यामुळे दुर्घटना टळली. तसेच या नागरिकांनी यावेळी मदतकार्य सुध्दा केलं.

 

रस्त्याची दुर्दशा झाली असून पायी चालणे सुध्दा मुश्लील झाले., याठिकाणी रोज लहानमोठे अपघात होत असतात, मात्र तरीही महापालिकेकडून रस्त्याची दुरूस्ती केली जात नाही, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेने नागरिकांची जीवाशी न खेळता रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Protected Content