फैजपूर शहरात एकावर चाकूहल्ला

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून एकावर चाकू हल्ला करून जखमी केल्याची घटना शहरातील आंबेडकर नगरात घडली. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फैजपूर शहरातील आंबेडकर नगरात जहागीर शेख शाबीर हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार ४ जुलै रोजी किरकोळ कारणावरून गल्लीत राहणारा भुषण मुकुंदा मेढे याने मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असतांना जहागीर शेख साबीर यांच्या घरात घसून चाकूने वार केले. यात जहागीरच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. तसेच जहागीर याला जीवेठार मारण्याची धमकी देवून भुषण मेढे हा पळून गेला. याप्रकरणी जहागीर शेख शाबीर यांची वहिनी फरदाना शेख उमर यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशति आरोपी भुषण मुकुंदा मेढे रा. आंबेडकर नगर, फैजपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमजद खान पठाण करीत आहे.

Protected Content