देवेंद्र फडणवीसांचे नागपूरमध्ये जंगी स्वागत

देवेंद्र फडणविसांचे नागपूरमध्ये जंगी स्वागत

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उपमुख्यमंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या शहरात आलेले देवेंद्र फडणवीस यांचे येथे भव्य स्वागत करून त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

राज्यातील सत्तांतराचे प्रमुख सूत्रधार असणार्‍या देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर येथील आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळी त्यांचे येथे आगमन झाले. नागपूर विमानतळावर सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस पोहोचले. येथे जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विजयी रथावर स्वार होत देवेंद्र फडणवीस यांनी शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या.

वास्तविक पाहता फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची सर्वांना अपेक्षा होता. मात्र ऐनवळी दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याच्या सूचना केल्या. यामुळे स्थनिक कार्यकर्ते नाराज झाले. मात्र त्यांनी पक्षासाठी त्याग केला असून याचचे शेकडो फलक आज नागपुर शहरात लावण्यात आले आहेत.

Protected Content